मैदानी खेळाच्या माध्यमातून विद्यार्थी खेळात मिळवताहेत प्राविण्य

0
31

सोयगाव : प्रतिनिधी
बदलत्या काळात तरुण ऑनलाईन गेमिंगच्या पाठीमागे असल्यामुळे मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. परंतु आपल्याकडे आजही मैदानी खेळाच्या माध्यमातून विद्यार्थी खेळात प्राविण्य मिळवितात, हे पाहून आनंद झाला असल्याचे प्रतिपादन अजिंठा शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश काळे यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि अजिंठा शिक्षण संस्था संचलित संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष पवार होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार, विद्यापीठ क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे, डॉ.संदीप जगताप, डॉ. महेश राजे निंबाळकर आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी प्रमुख पाहुण्यांनी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेत सुरुवात केली. स्पर्धेत १८० स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेत मोरेश्वर कॉलेज गंगामसलाचा विद्यार्थी संजय मारुती ढाकणे याने प्रथम क्रमांक, बंकट स्वामी कॉलेज बीडचा माकाडे किशोर विठ्ठल याने द्वितीय क्रमांक, एमएसएम बिपीएड कॉलेज, औरंगाबादचा विद्यार्थी कान्हारे आनंदा प्रल्हाद याने तृतीय क्रमांक, यशवंतराव चव्हाण कॉलेज, सिल्लोडचा विद्यार्थी दुधे मच्छिंद्र उत्तम याने चौथा क्रमांक, गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज, औरंगाबादचा सपकाळे सचिन गणेश याने पाचवा क्रमांक, सोयगाव संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचा पाटील समाधान दत्तू याने सहावा क्रमांक पटकाविला. मुलींच्या स्पर्धेत श्री पंडित कॉलेज, शिरसाळा येथील जाधव अश्विनी मदन हिने प्रथम क्रमांक, साळुंके योगिनी उमाकांत हिने द्वितीय क्रमांक, सुहानी सुधीर हिने तृतीय क्रमांक, सिल्लोड येथील वाय.सी.कॉलेजची काटे प्रतीक्षा कुंजलाल हिने चौथा क्रमांक पटकावला.
पंच म्हणून सुरेंद्र मोदी, डॉ.रमेश सर, रामेश्वर विधाते, डॉ. अभिजीत दिक्कत, डॉ.सचिन देशमुख, डॉ.सय्यद फिरोज, डॉ.अनिता पारगावकर, डॉ.सुनील गायसमुद्रे, प्रा.अनिल निळ, डॉ.रामदास जाधव, डॉ.सचिन पगारे, डॉ.पूनम राठोड, डॉ.जी.सूर्यकांत यांनी काम पाहिले. यावेळी पोलीस निरीक्षक अनमोल केदार, डॉ.दयानंद कांबळे, डॉ.संदीप जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी डॉ.सैराज तडवी, डॉ.निलेश गावडे, डॉ.सी.यु.भोरे, डॉ.सुशील जावळे, डॉ.विक्रम भुतेकर, डॉ.संतोष तांदळे, डॉ.दीपक डापके, डॉ.रमेश औताडे, डॉ.मेश्राम, डॉ.लक्ष्मीनारायण कुरपटवार, प्रा. उल्हास पाटील, डॉ.भास्कर टेकाळे, डॉ.प्रदीप गोलारे, डॉ.उमेश वामणे, डॉ.गणेश मिसाळ, डॉ.रामेश्वर मगर, डॉ.शंतनु चव्हाण, डॉ.ज्ञानबा भगत, डॉ.दीपक पारधे, डॉ.मनोज चोपडे, डॉ.सुनील चौधरी, प्रा.सुभाष पाटील, प्रा.विनोद चव्हाण, प्रा.शेख तोफिक, प्रा.शंकर कानडे, प्रा.सय्यद सर, प्रा.रवींद्र जाधव, प्रा.ज्योती स्वामी, प्रा.भारती पाटील, प्रा.निर्मला बोराडे, प्रा.स्वाती देशमुख, कार्यालयीन कर्मचारी पंकज साबळे, उदय सोनवणे, राहुल चौधरी, शंकर काळे, सीताराम सुरशे, गजानन शिरसागर, सुनील वाघ, सुनील साळुंखे, भगवान उसरे, दीपक बनकर, तोफिक पठाण आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक डॉ. रावसाहेब बरोटे, सूत्रसंचालन डॉ.रमेश औताडे तर क्रीडा विभाग प्रमुख डॉ.निलेश गाडेकर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here