जळगाव : प्रतिनिधी
सी. के. पी. सोशल क्लबच्या वतीने कै. कृष्णाकर टिपणीस यांच्या स्मरणार्थ ३ ऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन सी.के.पी. हॉल, खारकर आळी, ठाणे पश्चिम येथे करण्यात आले आहे.३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये खेळविण्यात येणारी ही स्पर्धा सी.के.पी.न्यातीगृह यांनी पुरस्कृत केली असून स्पर्धेतील विजेत्यांना तब्बल १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज maharashtracarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध असून स्पर्धेत भाग घेण्यासाठी खेळाडूंनी आपल्या जिल्हा कॅरम संंघटनेशी संपर्क साधावा,असे आवाहन मानद सचिव अरुण केदार यांच्यासह जळगाव कॅरम असो.चे श्याम कोगटा,नितीन बरडे व मंजूर खान यांनी केले आहे.