Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»‘बदन पे सितारे लपेटे हुए…’ ; मंत्री सावकारेंच्या मनात नेमके कोण?
    जळगाव

    ‘बदन पे सितारे लपेटे हुए…’ ; मंत्री सावकारेंच्या मनात नेमके कोण?

    Vikas PatilBy Vikas PatilMarch 24, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ‘बदन पे सितारे लपेटे हुए…’ ; मंत्री सावकारेंच्या मनात नेमके कोण?

    जळगाव (प्रतिनिधी)-

    राजकारणाचा व्याप सांभाळून खास गाणे म्हणण्याचा छंद वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनीही जोपासला आहे. संधी मिळेल तेव्हा पदाचा बडेजाव न मिरवता सहजपणे गाणाऱ्या मंत्री सावकारे यांनी रविवारी भुसावळमध्ये कार्यक्रमात ‘बदन पे सितारे लपेटे हुए…’ हे गाणे गायिले. या गाण्यानंतर मंत्री सावकारे यांच्या मनातील ती कोण, अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली.

    भुसावळमधील स्नेहयात्री प्रतिष्ठानकडून स्नेहयात्री करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा समारोपप्रसंगी उपस्थित मंत्री संजय सावकारे यांना गाणे म्हणण्याचा आग्रह झाला. तेव्हा फार आढेवेढे न घेता कराओकेच्या मदतीने त्यांनी ‘बदन पे सितारे लपेटे हुए…’ हे शम्मी कपूर यांच्यावर चित्रीत झालेले मोहंमद रफी यांच्या आवाजातील गाणे सादर करून रंगत वाढवली. गाणे गाताना त्यांनी धरलेला हळूवार ठेकाही सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्यांच्यातील गायकीला आणि साधेपणाला सर्वांनी दिली.

    ना. सावकारे विधानसभेच्या भुसावळ मतदारसंघातून २००९ पासून अनुसूचित जाती राखीव जागेवर निवडून येत आहेत. २०१३ मध्ये त्यांना पहिल्यांदा मंत्रीपदाची संधी मिळाली होती. नंतर त्यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. महायुतीच्या नवीन सरकारमध्ये वस्त्रोद्योग मंत्री असलेल्या सावकारे यांनी मेकॅनिकल पदविका घेतली आहे. व्यस्त दिनचर्चा सांभाळून गाण्याची आवड जोपासण्यावर त्यांनी भर दिला आहे. भुसावळ शहरातील हौशी गायकांनी मिळून तयार केलेल्या कराओके गटात ते सहभागी आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Rupali Chakankar : “भोंदूबाबा प्रकरणाचा मोठा धक्का; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब?”

    March 20, 2026

    Sanjay Raut : “खरात फाइल्स : संजय राऊतांचा दावा – राज्य मंत्रिमंडळातील ९ मंत्री भोंदूबाबाचे भक्त; मुख्यमंत्र्यांच्या कारवाईने धाबे दणाणले”

    March 20, 2026

    Jalgaon : जळगाव क्रिकेट उत्सव: JCL 2026 – पर्व 2; T20 थरार घेऊन येणार, स्थानिक खेळाडूंना सुवर्णसंधी

    March 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.