श्रीलंकेने विश्वचषकात उघडले विजयाचे खाते; नेदरलँड्सचा पाच विकेट्सनी उडवला धुव्वा

0
36

लखनऊ :  वृत्तसंस्था

एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या १९ व्या सामन्यात श्रीलंकेने नेदरलँड्सचा ५ गडी राखून पराभव केला.लखनऊच्या एकना स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सने २६२ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने पाच गडी गमावून २६३ धावा केल्या आणि स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. श्रीलंकेच्या विजयाचा हिरो सदिरा समरविक्रमा ठरला.तो १०७ चेंडूत ९१ धावा करून नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार मारले.
नेदरलँड्ससाठी आर्यन दत्त हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.आर्यन दत्तने १० षटकांत ४४ धावांत ३ गडी बाद केले. याशिवाय पॉल वॉन मीकेरेन आणि कॉलिन अकरमन यांना १-१ विकेट मिळाली. तत्पूर्वी, नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडने ४९.४ षटकांत सर्वबाद २६२ धावा केल्या. एकवेळ नेदरलँड संघाने ९१ धावांत ६ विकेट गमावल्या होत्या मात्र, यानंतर सायब्रँड एंजेलब्रेक्ट आणि लोगन व्हॅन बीक यांच्या १३५ धावांच्या भागीदारीने डच संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले.
यानंतर विश्वचषकातील सातव्या विकेटसाठी ही सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे.सायब्रँडने ८२ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७० धावा केल्या तर व्हॅन बीकने ७५ चेंडूत १ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५९ धावा केल्या.श्रीलंकेकडून दिलशान मदुशंका आणि कसून राजिता यांनी प्रत्येकी ४ गडी बाद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here