मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली श्रीलंकेच्या सेनानायकेला अटक

0
4

कोलंबो : वृत्तसंस्था

श्रीलंकेने काल (मंगळवारी) अफगाणिस्तानवर विजय साकारला. या विजयासह श्रीलंकेच्या संघाने आशिया कपच्या सुपर ४ फेरीत प्रवेश केला आहे. पण या विजयानंतर आता श्रीलंकेसाठी वाईट बातमी आली आहे. कारण श्रीलंकेचा मॅचविनर खेळाडू आता मॅच फिक्सिंगमध्ये दोषी सापडला आहे. त्यामुळे आता या खेळाडूला मॅच फिक्सिंगच्या आरोपांखआली अटकही करण्यात आली आहे.श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सचित्रा सेनानायकेला बुधवारी मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. आज सकाळी शरणागती पत्करल्यानंतर त्याला क्रीडा भ्रष्टाचार अन्वेषण युनिटने अटक केली. तीन आठवड्यांपूर्वी त्याला परदेशात जाण्यास न्यायालयाने बंदी घातली होती. सेनानायके याच्यावर लंका प्रीमियर लीगच्या (एलपीएल) २०२० साली झालेल्या हंगामात मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here