जळगाव : प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव आयोजित नाशिक विभागीय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेत१४, १७,१९ वर्षे मुलांच्या वयोगटात सिद्धिविनायक विद्यालय विजयी झाले.
छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन सिद्धिविनायक फाउंडेशनच्या संचालिका डॉ.अमृता सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी शिवछत्रपती राज्यक्रीडा पुरस्कार प्राप्त डॉ. प्रदीप तळवेलकर सर, सॉफ्टबॉल मार्गदर्शक श्रीधर गाडगीळ, किशोर चौधरी, विजय न्हावी, विशाल फिरके, मनपा क्रीडा अधिकारी दीनानाथ भामरे, क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने, आर.पी. खोडपे, आनंद पवार,अनिल माकोडे, प्रकाश तायडे हे उपस्थित
होते.
स्पर्धेेच्या निमित्ताने चेन्नई तामिळनाडू येथे झालेल्या राष्ट्रीय सिनिअर गट आट्यापाट्या स्पर्धेतील सिल्वर मेडल प्राप्त खेळाडू रोहित नवले, स्वप्निल महाजन, नेहा कंग्टे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा आट्यापाट्या संघटनेचे अक्षय टेमकर, लीलाधर पाटील, देवेश पाटील, स्वप्निल महाजन, रोहित नवले, दीपेश पाटील, भूपेंद्र भारंबे, सुरेश पाटील, योगेश शर्मा, लोकेश पाटील, गणेश ढेमसे, नेहा कंगते, चैताली चौधरी, दिलीप वासुदेव महाजन, यांनी पंच म्हणून काम पाहिले.
