जळगाव : प्रतिनिधी
भोरगाव लेवा पंचायतीच्या भुसावळ शाखेतर्फे आठवा सामुहिक विवाह सोहळ्यात आज १२ जोडपी विवाहबद्ध झाली. संतोषीमाता हॉल येथे भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेतर्फे या आठव्या सामुहिक विवाहांचे आयोजन करण्यात आले होते
या विवाह सोहळ्यासाठी मान्यवर, प्रतिष्ठित हजर होते. सर्वप्रथम उपक्रम चेअरमन आरती चौधरी यांनी विवाहबद्ध होणाऱ्या मुला मुलींचे विवाहपूर्व समुपदेशन केले. नंतर विवाहविधींची सुरवात झाली.
या विवाहा सोहळ्यासाठी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह भावी कुटुंबनायक ललीत पाटील उपस्थित होते. त्यांनी संभाजीनगरहून आलेले उद्योगपती वसंत पाटील, किरण महाजन, चंद्रकांत चौधरी, मनिष चौधरी, भंगाळे गोल्डचे भागवत भंगाळे, अरूण बोरोले, यांचा सत्कार केला.
प्रस्ताविकात आरती चौधरी यांंनी भोरगाव लेवापंचायतच्या कार्यक्रमांविषयी माहिती दिली व खर्चिक लग्न पध्दतीला आळा बसावा, चुकीच्या पध्दती बंद व्हाव्या म्हणून हा सोहळा आम्ही घेत आहोत असे सांगितले. माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी सामुहिक विवाह काळाची गरज आहे. अशा विवाहांसाठी सगळ्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे असे सांगितले. या विवाह सोहळ्यासाठी भुसावळ भोरगाव लेवा पंचायतचे अध्यक्ष अँड. प्रकाश पाटील, सचिव डॉ. बाळू पाटील, महेश फालक, आरती चौधरी, चेतन पाटील, परिक्षीत बऱ्हाटे, मंगला पाटील, स्वाती भोळे, शरद फेगडे, माजी आमदार निळकंठ फालक, दिगंबर महाजन, आर. जी. चौधरी, अनिल वराडे, जळगावचे डॉ. मिलींद पाटील हजर होते. सुत्रसंचलन चेतन पाटील यांनी केले. शालीनी पाटील, अर्चना पाटील, कल्पना फालक, उज्ज्वला महाजन, डॉ. मृणाल पाटील, नीला चौधरी, उल्हास पाटील, जगदीश फिरके यांनी या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
