नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय संघाला आता सर्वात मोठा धक्का बसला आहे कारण आता भारताचा टी-२० कर्णधार संघाबाहेर जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना सूर्याला दुखापत झाली होती. त्यानंतर सूर्याला मैदानातून बाहेर नेण्यात आले होते. त्यामुळे त्याची दुखापत गंभीर असल्याचे वाटत होते पण या सामन्यानंतर सूर्या चालत आला होता आणि आपली दुखापत गंभीर नसल्याचे सूर्याने सांगितले होते. पण ही दुखापत गंभीर असल्याचे आता समोर आले आहे.
कारण सूर्याच्या घोट्याला गंभीर दुखापत झाली आहे आणि तो आता तब्बल सात आठवडे तरी क्रिकेट खेळू शकणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता सूर्याला किमान दोन महिने तरी क्रिकेट खेळता येणार नाही. हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्याकडे भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात जानेवारी महिन्यात टी-२० मालिका होणार आहे. त्या मालिकेत हार्दिक खेळणार नाही आणि आता तर सूर्याही खेळू शकमार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हार्दिक अफगाणिस्तानच्या टी-२० मालिकेत खेळेल, असे म्हटले जात होते पण समोर आलेल्या हार्दिकच्या दुखापतींच्या अपडेट्सनुसार आता हार्दिक ही टी-२० मालिका खेळणार नाही. वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळत असताना हार्दिकला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर स्वरुपाची होती. त्यामुळे त्याला त्यानंतरही एकही सामना खेळता आला नाही. हार्दिकच्या जागी भारतीय संघात मोहम्मद शमीला संधी मिळाली आणि त्याने मैदान गाजवले.