शार्दुल ठाकूर दुसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी सज्ज?

0
22

सेंच्युरियन : वृत्तसंस्था

दक्षिण आफ्रिकेत भारताला ३ जानेवारीपासून दुसरा कसोटी सामना खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी नेटमध्ये सराव करताना भारताचा अष्टपैलून खेळाडू शार्दुल ठाकूरच्या खांद्याला जबर दुखापत झाल्याची बातमी समोर आली होती, त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीत खेळेल की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता शार्दुलच्या या दुखापतीबाबत मोठी अपडेट मिळाली आहे.
अष्टपैलू शार्दुल ठाकूर आता दुसऱ्या कसोटीपूर्वी वैकल्पिक प्रशिक्षण सत्रादरम्यान खांद्याला दुखापत झाल्यानंतर चांगल्या स्थितीत असल्याचे सांगितले जाते. सेंच्युरियन येथे शनिवारी शार्दुलच्या डाव्या खांद्याला दुखापत झाल्याची घटना घडली, एका सपोर्ट स्टाफच्या सदस्याच्या थ्रोडाऊनचा सामना करताना त्याला दुखापत झाली. चेंडू लागल्यानंतरही ठाकूरने फलंदाजी सुरूच ठेवली. भारतीय संघाच्या मेडिकल स्टाफने त्याच्यावर कोणतेही उपचार किंवा स्कॅन करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. भारतीय संघातील सूत्राने क्रिकबझला सांगितले की, शार्दुल ठाकूरच्या फिटनेसबाबत कोणतीही चिंता नाही.
सेंच्युरियन येथे झालेल्या वैकल्पिक प्रशिक्षण सत्रात कर्णधार रोहित शर्मा, आर. अश्विन, यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा, केएस भरत आणि शार्दुल ठाकूर यांच्यासह मर्यादित खेळाडू उपस्थित होते.दुखापतीच्या घटनेनंतरही, संघातील मनःस्थिती सकारात्मक आहे आणि ठाकूर पुढील सामन्यात उपलब्ध असेल अशी अपेक्षा आहे.
न्यूलँड्स स्टेडियमवर ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटीसाठी भारतीय संघ रविवारी केपटाऊनला रवाना झाला आहे. कसोटीसाठी प्लेइंग लाइनअप अद्याप निश्चित झाले नसले तरी, पहिल्या कसोटीत पदार्पण करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाला वगळले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. प्रसिध्द कृष्णाने पहिल्या कसोटीत फारशी प्रभावी गोलंदाजी केली नाही, त्यामुळे संघ व्यवस्थापनाने मुकेश कुमार आणि आवेश खान यांच्या पर्यायांचा विचार केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here