Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»शरद पवारांची आज जळगावात स्वाभिमान सभा
    जळगाव

    शरद पवारांची आज जळगावात स्वाभिमान सभा

    Kishor KoliBy Kishor KoliSeptember 4, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जळगावातील सागर पार्क येथे ५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
    सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्हाभरातून हजारोंचा जनसमुदाय उपस्थित राहील असा अंदाज घेऊन भव्य मंडप आणि बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सभास्थळाची सोमवारी सायंकाळी पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी पहाणी केली तसेच या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर शरद पवारांच्या राज्यभर सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येवला आणि बीडची सभा गाजल्यानंतर जळगावात ही भव्य सभा होत आहे. या सभेला पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, रोहित पवार हेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या सभेत काही माजी खासदार, आमदार यांच्यासह कार्यकर्त्यांचा प्रवेश होण्याचीही शक्यता आहे.
    पक्ष आणि चिन्हापेक्षा अख्खा महाराष्ट्र
    पवारसाहेबांसोबत : रोहीत पवार
    चिन्ह असलं काय आणि नसलं काय आमच्याकडे पवार साहेब आहेत. तुमच्याकडे जे चिन्ह आहे ते तुम्ही ठेवा मात्र अख्खा महाराष्ट्र हा शरद पवार साहेबांसोबत राहून लढणार आहे. स्वार्थी राजकारण आम्हाला जमत नाही असे टीकास्त्र आमदार रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाच्या कोर्टात असलेल्या प्रकरणावर प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्याला आमदार रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. जळगावातील खेडी येथील आयोजित मेळाव्यानंतर आमदार रोहित पवार पत्रकारांशी बोलत होते. १९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला. त्यावेळी लोकांनी घड्याळाकडे बघितले नव्हते तर शरद पवार साहेबांकडे बघितले होतं.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Muktainagar: हरताळा फाट्यानजीक भीषण अपघात राँग साइडने धावलेल्या कारने पाच मजुरांना उडविले

    March 12, 2026

    Jalgaon : जळगावात एलपीजीचा तीव्र तुटवडा गॅससाठी रिक्षांच्या किलोमीटर लांब रांगा, चालकांचे हाल

    March 12, 2026

    Pachora : पाचोर्‍यात वॉटर हिटरचा शॉक फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.