दिशा पाटीलची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

0
15

जळगाव : प्रतिनिधी
बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियातर्फे उत्तरप्रदेश येथे २० ते २७ डिसेंबर २०२३ दरम्यान होणाऱ्या ७ व्या वरिष्ठ महिला बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघामध्ये दिशा पाटीलची ६०- ६३ किलो वजन गटात निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेची निवड चाचणी अकोला येथे घेण्यात आली होती. निवड चाचणी मध्ये श्रावणी बारगे (सातारा), मितीका गुनेले (मुंबई), तेजस्विनी पारखे (बुलडाणा) व दिशा पाटील (जळगाव)या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. वरील सर्व खेळाडूंवर मात करून दिशाने निवड चाचणीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
दिशाला जिल्हास्तरीय खेलो इंडिया बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक निलेश बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने, एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक व जळगाव शहर बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, उपाध्यक्ष डॉ. अमोल पाटील, सहसचिव नयन राणे,खजिनदार रोहिदास पाटील,रवी नरवाडे, संतोष सुरवाडे, डॉ.सचिन वाणी,डॉ.सारिका वाणी, सुरज नेमाडे, राकेश पाटील, राकेश मु. पाटील, विशाल बाविस्कर, विजय पाटील, विशाल सोनावणे व शारदा पाटील यांनी अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here