अखिल भारतीय रायफल शुटींग स्पर्धेसाठी जळगावच्या ८ खेळाडूंची महाराष्ट्र संघात

0
16

जळगाव ः प्रतिनिधी

अहमदाबाद, महू, असंसोल येथे होणाऱ्या अखिल भारतीय रायफल शुटींग स्पर्धांसाठी जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनच्या ८ खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे त्यात वैभव प्रमोद सोनवणे,दीपक भाऊलाल कोळी,दिलीप लक्ष्मण गवळी,भावेश प्रकाश गवळी,कुमारी सिमरा आसिफ खान आदींचा समावेश आहे.
१८ ते ३० ऑगस्ट २०२३ दरम्यान अहमदाबाद (गुजराथ) येथे १० वी वेस्ट झोन शुटींग चॅम्पीयनशीप स्पर्धा तसेच १ ते १० सप्टेंबर २०२३ पर्यंत महू (मध्य प्रदेश) येथे ३२ व्या ऑल इंडिया जी.व्ही. मावळणकर शुटींग चॅम्पीयनशीप या रायफल प्रकारातील स्पर्धा होत असून ९ ते १६ सप्टेंबर पर्यंत असंंसोल (वेस्ट बंगाल) येथे होणाऱ्या ३२ व्या ऑल इंडिया जी.व्ही.मावळणकर शूटींग चॅम्पीयनशिप या पिस्तोल प्रकारातील स्पर्धांचे आयोजन नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने केले आहे.
या अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्यांच्या संंघात जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनच्या ८ खेळाडूंंची निवड झाली आहे.या स्पर्धांमध्ये भारतीय सैन्याचे तिन्ही दलांचे संघ व सर्व निमलष्करी दलांचे संघ व देशातील सर्व राज्यांचे संघ वेगवेगळया शस्त्रांच्या व वेगवेगळया गृपमधून सहभागी होतील.
निवड झालेल्या खेळांडूंचा सत्कार करण्यात आला.यावेळी राष्ट्रीय पंच नितीन अहिरे, उपाध्यक्ष प्रा. यशवंत सैंदाणे, मुख्य प्रशिक्षक दिलीप गवळी, प्रशिक्षक व राष्ट्रीय खेळाडू पोलीस हवलदार प्रकाश गवळी,एनआयएस प्रशिक्षक व राष्ट्रीय खेळाडू कुमारी प्रियंंका पटाईत उपस्थित होते.
या खेळाडूंंची महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष विशन मिलवानी, उपाध्यक्ष प्रा. यशवंत सैंदाणे, सचिव दिलीप गवळी, सहसचिव सुनिल पालवे, प्रसिध्दी प्रमुख प्रा.विनोद कोचुरे यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्यात.
निवड झालेले खेळाडू व त्यांच्या स्पर्धा
दीपक भाऊलाल कोळी – ५० मी. फ्री पिस्तोल,वैभव प्रमोद सोनवणे -१० मी.एअर पिस्तोल,पुष्पराज नारायण वाघ – १० मी. एअर पिस्तोल – एनसीसी गृप,दिलीप लक्ष्मण गवळी – १० मी. एअर पिस्तोल वरिष्ठ गट,अभय अनिल पेंढारकर – १० मी. पिप साईट एअर रायफल, भावेश प्रकाश गवळी- १० मी.पिप साईट एअर रायफल,निखील धुडकू सपकाळे – १० मी.पिप साईट एअर रायफल,कुमारी सिमरा आसिफ खान (जामनेर) – १० मी. पिप साईट एअर रायफल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here