पुणे : प्रतिनिधी
ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांची अधिष्ठातापदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या निकालावरुन त्यांना अधिष्ठातापदावरून हटवण्यात आले आहे. ललित पाटील प्रकरणामुळे संजीव ठाकूर चर्चेत होते.त्यांच्या जागी आता पुर्वीचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांंची अधिष्ठातापदावर नियुक्ती करण्यात आली आहे.मागील काही दिवसांपासून संजीव ठाकूर हे नाव चांगलेच चर्चेत होते.