भक्तांना पाच लाखापर्यंत विमा संरक्षण; साई संस्थानची घोषणा

0
8

भक्तांना पाच लाखापर्यंत विमा संरक्षण; साई संस्थानची घोषणा

शिर्डी (प्रतिनिधी)-

येथे दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांना आता ५ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळणार आहे. हा निर्णय भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

शिर्डीमध्ये दररोज लाखो भक्त दर्शनासाठी येतात. साईबाबांच्या भक्तांमध्ये सर्व स्तरांतील लोकांचा समावेश असतो. काही वेळा यात्रेदरम्यान अपघात, आजारपण किंवा इतर आपत्ती अशा घटना घडतात अशा परिस्थितीत साई संस्थानाने दिलेल्या विमा सुविधेचा लाभ संबंधित भक्त किंवा त्यांच्या कुटुंबीयांना मिळणार आहे.

साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी साई संस्थानच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे बंधनकारक असेल. भक्तांनी प्रवासापूर्वी नोंदणी करावी लागेल. नोंदणी झाल्यावर, भक्त घरातून निघाल्यापासून दर्शन होईपर्यंतच्या कालावधीसाठी विमा संरक्षणाच्या कवचाखाली असतील. या कालावधीमध्ये काही अप्रिय घटना घडल्यास ५ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण संबंधित भक्त किंवा त्यांच्या कुटुंबियांना मिळेल.

साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना काही अडचण आली, तर संस्थानाच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदतीचा मोठा आधार मिळणार आहे. हा निर्णय साईभक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. विशेषतः लांबून येणाऱ्या भाविकांसाठी हा विमा कवच मोठा आधार ठरणार आहे. वार्षिक उत्सव किंवा गर्दीच्या काळातही या निर्णयामुळे भक्तांचे संरक्षण सुनिश्चित होणार आहे. साई संस्थानाच्या या निर्णयाचे भाविकांकडून स्वागत होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here