Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»मुंबई इंडियन्सच्या पोस्टमधून रोहितचा फोटो गायब झाल्याने भडकले चाहते
    क्रीडा

    मुंबई इंडियन्सच्या पोस्टमधून रोहितचा फोटो गायब झाल्याने भडकले चाहते

    Kishor KoliBy Kishor KoliJanuary 14, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी
    गेल्या काही महिन्यांपासून इंडियन प्रीमियर लीगमधील मुंबई इंडियन्स सोशल मीडियावर वादांच्या केंद्रस्थानी आहे. २०२१ च्या हंगामानंतर हार्दिक पांड्याला फ्रेंचायझीने पुन्हा एकदा संघात घेतले आहे. पांड्याने गुजरात टायटन्सचे कर्णधारपद भूषवले होते. त्यानंतर आता मुंबई इंडियन्सने मात्र पंड्याला फक्त परत आणण्याचा निर्णयच घेतला नाही तर त्याला कर्णधार देखील केले आहे. रोहित शर्माला बाजूला करत हार्दिकवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी फ्रेंचायझीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून रोष व्यक्त केला आहे. त्यातच आता मुंबई इंडियन्सने केलेल्या एका फोटोमुळे वातावरण आणखी तापले आहे.
    इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी बीसीसीआयने १६ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या चार फिरकी गोलंदाजांसह भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाच्या घोषणेनंतर, आयपीएलच्या अनेक संघांनी त्यांच्याशी संबंधित खेळाडूंबद्दल पोस्ट शेअर केली आहे मात्र यावेळी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या फोटोशिवाय भारतीय संघाची फोटो शेअर केल्याने चर्चा सुरु झाली आहे त्यामुळे मुंबई इंडियन्सला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
    मुंबई इंडियन्सच्या पोस्टमधून रोहित शर्माचा फोटो गायब झाल्याने चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. बीसीसीआयच्या घोषणेनंतर मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी भारतीय संघात समाविष्ट असलेल्या खेळाडूंची नावे शेअर केली आहेत. मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या पोस्टमध्ये केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर दिसत आहेत मात्र यामध्ये कर्णधार रोहित शर्मा नसल्याने मुंबईच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चाहत्यांच्या मते, भारतीय संघाचा कर्णधार असल्याने रोहितचा फोटो तिथे वापरायला हवा होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    India vs England Semi-Final: उपांत्य फेरीत टीम इंडियाचा प्लेइंग 11 निर्णय, बेंचवर बसणार हे चार महत्त्वाचे नाव

    March 5, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026

    Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड

    January 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.