रोहितने बांगलादेश क्रिकेट सामन्याच्या आधी भरला चार हजार रुपयांचा दंड

0
37

पुणे : प्रतिनिधी

पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर भरधाव वेगात वाहन चालवणे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला चांगलेच महागात पडले आहे. एकाच दिवशी दोन वेळा नियमांचे भंग करत भरधाव वेगात कार चालवली आहे.याबाबतची बातमी प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचल्याने ऐन भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामना सुरू होण्याच्या दोन तास अगोदर रोहितने ऑनलाइन पद्धतीने दंड भरला.
पुण्यात भारत विरुद्ध बांग्लादेश क्रिकेट सामना असल्याने रोहित शर्मा मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत होता तेव्हा, भरधाव वेगात असलेली कार सीसीटीव्हीत कैद झाली आणि वेगमर्यादा ओलांडली असल्याचे स्पष्ट झाले. १७ ऑक्टोबरला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून रोहित शर्मा त्याच्या निळ्या रंगाच्या वाहनाने पुण्याच्या दिशेने येत होता. भरधाव कारचा वेग हा द्रुतगती महामार्गावर लागलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला. कारचा वेग ११४ ते ११७ असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले. त्यामुळे रोहितला दोन हजारांचा दंड झाला.त्याच दिवशी पुण्यात रोहितला सोडून त्याचे वाहन परत जात असताना पुन्हा दोन हजारांचा दंड झाला.
पुण्यात भारत विरुद्ध बांगलादेश हा क्रिकेट सामना असल्याने रोहितला दोन दिवस आधी येणे क्रमप्राप्त होते, त्याच्या खासगी कारने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून येत असताना त्याला दंड झाला. ही बाब तत्काळ लक्षात येताच १९ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्याच्या दोन तास आधी रोहितने चार हजारांचा दंड भरला, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here