नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ऋषभ पंत आयपीएल २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी पुन्हा खेळण्यासाठी सज्ज आहे. मीडिया रिपोर्टसच्या मते, तो कर्णधार म्हणून पुनरागमन करेल, पण मैदानावरील त्याची भूमिका बदलणार आहे. पंत फेब्रुवारीच्या अखेरीस पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी फ्रेंचायझीला आशा आहे. डिसेंबर २०२२ मध्ये कार अपघातात गंभीर दुखापत झाल्यानंतर २०२३ चा हंगाम तो खेळू शकला नाही.
मात्र, पंत यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून खेळणार की नाही हे निश्चित झालेले नाही. पंत कर्णधार आणि फलंदाज म्हणून मिळाल्याने फ्रेंचायझी खूश असल्याचे समजत आहे. मात्र, तो मैदानावर विकेट कीपिंग करताना दिसणार नाही. पंतचे आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याचे पहिले संकेत नोव्हेंबरमध्ये आले, जेव्हा तो कोलकाता येथील दिल्ली कॅपिटल्सच्या शिबिरात उपस्थित होता, तसेच वरिष्ठ फ्रँचायझी सपोर्ट स्टाफसह सौरव गांगुली (क्रिकेट संचालक), आमरे (सहाय्यक प्रशिक्षक), रिकी पाँटिंग (मुख्य प्रशिक्षक) आणि प्रवीण यांनीही सहभाग घेतला.
त्यानंतर पंतने दुबई येथे १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या पुढील लिलावापूर्वी खेळाडूंना कायम ठेवण्याबाबत आणि रिलीज करण्याबाबत चर्चेत भाग घेतला. कार अपघातात त्याच्या उजव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे २०२३ मध्ये पंत सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून बाहेर होता. पंतवर यशस्वी लिगामेंट्सची शस्त्रक्रिया झाली आहे आणि बेंगळुरू येथील च्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याचे पुनर्वसन सुरू आहे. अलिकडच्या काही महिन्यांत, त्याने व्हिडिओ पोस्ट केले होते की, ते रिकव्हरीवर काम करत आहेत.