सोलापूर : वृत्तसंस्था
आरक्षणाचा विषय, जातनिहाय जनगणना या विषयांवर पक्षापेक्षा माझे वेगळे मत आहे. शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि जातीय व्यवस्थेवर काम करायचे हे मला मान्य नाही. ज्यांना आरक्षणाचा लाभ झाला आहे त्यांनी आरक्षण सोडून दिले पाहिजे, श्रीमंतांनी आरक्षणाचा लाभ घेऊ नये असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केलं. ओबीसींचे काढून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये असे मतही त्यांनी व्यक्त केले.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, सन १९८० पर्यंत जात हा मुद्दा राज्यात महत्त्वाचा नव्हता, १९८५ नंतर मात्र परिस्थिती बदलली. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि जातीय व्यवस्थेवर चालायचे हे मला अजिबात मान्य नाही. जातीचा आणि आर्थिक विषयाचा काहीही संबंध नाही. पण राज्यात सुरू असलेली परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागते, पुढे काय होईल सांगता येत नाही. आरक्षण देण्याचे सरकारने कबुल केले असेल तर ते त्यांनी द्यायला हव, कायद्याच्या चौकटीत ते कसे बसवयाचे हे सरकारने ठरवावे. माझ मत आहे की कोणाचे आरक्षण काढून देऊ नये, स्वतंत्र कायदा केला पाहिजे. माझे मत आहे की जोपर्यंत आवश्यकता आहे तोपर्यंतच आरक्षण वापरले पाहिजे, नंतर सोडलं पाहिजे. ज्यांची आर्थिक क्षमता आहे त्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊ नये.