एक तास वाहतुकीची झाली कोंडी
साईमत/रावेर/प्रतिनिधी :
पंढरपूर येथे आमरण उपोषणाला बसलेल्या समाज बांधवांना पाठिंबा देण्यासाठी व धनगर (ST) आरक्षण अंमलबजावणीसाठी रावेर येथील नवीन विश्रामगृह जवळील बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने धनगर समाज उपस्थित होता. त्यामुळे सुमारे एक तास वाहतुकीची कोंडी झाली होती. याप्रसंगी संदीप सावळे, राजन लासुरकर, ॲड. प्रवीण पाचपोहे , सुरेश धनके यांनी समाजाच्या मागण्या शासनाने पूर्ण करावे, यासाठी भाषण केले. धनगर समाजाला एसटीचे जात प्रमाणपत्र मिळावे, अशा प्रमुख मागणीचे निवेदन नायब तहसीलदार संजय तायडे यांना देण्यात आले. त्यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.
धनगड आणि धनगर एकच आहे. धनगड जमात राज्यात अस्तित्वात नाही.त्यामुळे शासनाने धनगडच हा धनगर आहे. कारण अस्तित्वहीन जातीला आरक्षण देता येत नाही. त्यामुळे हिंदीमध्ये धनगड आणि मराठी धनगर होतो.याप्रसंगी तालुक्यातील असंख्य धनगर बांधव शेळ्या, मेंढ्या घेऊन उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी जयेश कुयटे, स्वप्निल लासुरकर, ज्ञानेश्वर केळकर, ईश्वर निळे, शुभम नमायते, हिलाल सोनवणे, तुषार कचरे, शालीक सावळे, गणेश बोरसे, रमेश कचरे, रमेश सावळे, चंद्रकांत वैदकर, ॲड.भास्कर निळे, प्रवीण सावळे नेहता, उज्ज्वल सावळे, डिगंबर बोरसे, दिलीप सोनवणे, दिलीप अजलसोंडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक लखन सावळे यांनी केले.