4 अल्पवयीन मुलींसह २ मुलांना रावेर पोलीसांनी शोधून आणले
रावेर (प्रतिनिधी)-
रावेर पोलीसांच्या अथक प्रयत्नांनी फुस लाऊन पळवून नेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा मध्यप्रदेशातून तर दोन मुले व दोन मुलींना ओडीसा राज्यातून असे सहा अल्पवयीन मुलांचा शोध लागला आहे.
या अल्पवयीन मुले, मुलींना अज्ञात इसमाने फुस लावुन पळवून नेले होते. रावेर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल करण्यात आले होते. तपासात गुप्त बातमीदार, नातेवाईकांची चौकशी करुन, सिसीटिव्ही फुटेज व तांत्रिक विष्लेशन करुन अपह्रत मुले व मुलींची माहिती काढुन त्यांना टिकिरी, ओडीसा मकपदारा जंगलामधून शोध घेतला. त्यानंतर एका मुलीस इंदौर येथुन शोध घेऊन आणले एक मुलगी नायर ता. खकनार जि. बुऱ्हाणपुर येथुन ताब्यात घेवुन त्यांना सुखरुप रावेर येथे आणून आई वडीलांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कार्यवाही उपनिरीक्षक मनोज महाजन, तुषार पाटील, दिपाली पाटील, पो. हे. कॉ. ईश्वर चव्हाण, सुनिल वंजारी, पो. कॉ. सचिन घुगे, नितीन सपकाळे, श्रीकांत चव्हाण, पो. कॉ. गौरव पाटील (स्थागुशा जळगांव) यांच्या पथकाने केली आहे.