Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»राहुल सिंह गहलोतची वादळी फलंदाजी फक्त १४३ चेंडूत झळकावले द्विशतक
    क्रीडा

    राहुल सिंह गहलोतची वादळी फलंदाजी फक्त १४३ चेंडूत झळकावले द्विशतक

    Kishor KoliBy Kishor KoliJanuary 6, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कोहिमा : वृत्तसंस्था
    रणजी ट्रॉफी २०२४च्या हंगामाला सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील एक मॅच नागालँड आणि हैदराबाद यांच्यात नागालँड क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात राहुल सिंह गहलोतने वादळी फलंदाजी करत १४३ चेंडूत द्विशतक झळकावले. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील हे दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान द्विशतक ठरले. राहुल जेव्हा बाद झाला तेव्हा त्याने १५७ चेंडूत २३ चौकार आणि ९ षटकारांसह २१४ धावा केल्या होत्या.
    राहुलची फलंदाजी सुरू असताना एक वेळ असे वाटत होते की, तो भारताचे माजी प्रशिक्षक आणि फलंदाज, ऑलराउंडर रवी शास्त्रींचा सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम मोडतोय की काय पण शास्त्रींचा विक्रम थोडक्यात बचावला असे म्हणावे लागले. रवी शास्त्रींनी फक्त १२३ चेंडूत बडोदा विरुद्ध द्विशतक झळकावले होते. भारतीय क्रिकेटमध्ये हा विक्रम आज देखील कायम आहे.
    हैदराबादकडून खेळणाऱ्या राहुल सिंहने रणजी ट्रॉफी २०२३-२४ मध्ये नागालँडविरुद्ध द्विशतक करत या हंगामातील पहिल्या द्विशतकाची नोंद केली. याआधी राहुल सर्व्हिसेसकडून खेळत होता. त्याने १४३ चेंडूत प्रथम श्रेणीतील दुसऱ्या सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम केला.
    या सामन्यात नागालँडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता पण हा निर्णय फार योग्य ठरला नाही. राहुलनेच्या वादळी फलंदाजीने आणि तन्मय अग्रवालच्या १०९ चेंडूत ८० धावांच्या जोरावर हैदराबादने ३६.४ षटकात २३५ धावा केल्या होत्या. राहुल बाद झाला तेव्हा हैदराबादने ५३.३ षटकात ३५३ धावा केल्या होत्या. यातील राहुलच्या धावा २१४ इतका होत्या. राहुल बाद झाल्यानंतर कर्णधार तिलक वर्माने शतक पूर्ण केले आणि संघाला ४००च्या पुढे पोहोचवले. हैदराबादने ७६.४ षटकात ५ बाद ४७४ धावा केल्या. वर्माने नाबाद १०० तर रवी तेजाने नाबाद २१ धावा केल्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jalgaon : महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे मंत्री रक्षाताई खडसे

    March 8, 2026

    India vs England Semi-Final: उपांत्य फेरीत टीम इंडियाचा प्लेइंग 11 निर्णय, बेंचवर बसणार हे चार महत्त्वाचे नाव

    March 5, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.