अहिराणी साहित्य संमेलनालात देणगीसाठी क्यूआर कोड

0
58

अहिराणी साहित्य संमेलनालात देणगीसाठी क्यूआर कोड

अमळनेर (प्रतिनिधी)-

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह परिसरात अहिराणी सेवक साथी गुलाबराव पाटील साहित्यनगरी पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनासाठी सज्ज आहे. ३० व ३१ मार्च रोजी होणाऱ्या या संमेलनात अहिराणी भाषेच्या संवर्धनासाठी मागण्यांचे ठराव मांडले जाणार आहेत.

संमेलनात अहिराणी भाषा मराठी अभ्यासक्रमात समाविष्ट करा, अहिराणी साहित्य प्रकाशित करण्यासाठी विशेष अनुदान जाहीर करा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अहिराणी अभ्यास केंद्र स्थापन करा या मागण्यांचा समावेश आहे. संमेलनाचे उद्घाटन मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर महाले यांच्या हस्ते होणार असून, संयोजन समितीने महाराष्ट्रभर प्रचार करून साहित्यप्रेमी, लेखक, कवी व विचारवंतांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
प्रमुख पाहुणे, पत्रकार आणि रसिकांसाठी प्रशस्त व्यवस्था केली आहे. संमेलनस्थळी स्वतंत्र पार्किंग आहे. जायंट्स ग्रुपतर्फे ताक व सामाजिक कार्यकर्ते चिंधू वानखेडे यांच्यातर्फे सरबत वाटप करण्यात येणार आहे.

मुख्य संयोजक डॉ. लिलाधर पाटील यांनी सांगितले की, अमळनेर येथे होणारे हे संमेलन अहिराणी भाषेसाठी मैलाचा दगड ठरेल. संमेलनाच्या प्रवेशद्वाराला माजी आमदार सदाशिव माळी यांचे नाव देण्यात आले आहे. संमेलनाचे कार्याध्यक्ष अशोक पवार यांनी संमेलन शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी तयारी केली असल्याचे सांगितले.

संमेलन यशस्वी करण्यासाठी संयोजन समिती सदस्य रामेश्वर भदाणे, चंद्रकांत देसले, प्रेमराज पवार, भारती कोळी, प्रा. पवन पाटील, प्रा. माणिक बागले, प्रा. प्रशांत पाटील, महेश पाटील, वाल्मीक मराठे, रेखा मराठे, सुनंदा चव्हाण, हेमकांत अहिरराव, योगेश पाटील, अजय भामरे, सर्जेराव शिसोदे आदी १०० कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. संमेलनाच्या खर्चासाठी संयोजकांनी मदत गोळा करण्यासाठी स्कॅनर कोड लावला असून ज्येष्ठ नागरिक स्वेच्छेने योगदान देत आहेत. संयोजकांतर्फे मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here