दहशतवादी हल्ल्याचा यावल येथे निषेध
यावल (प्रतिनिधी)-
काश्मीरमधील पहेलगामला झालेल्या अतिरेकी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचे प्राण गेले या भीषण हल्ल्याचा निषेध करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने यावल तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे हे निवेदन सादर करण्यात आले.
२१ एप्रिल रोजी या हल्ल्यात भारतीय तसेच परदेशी पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त होत असून यावलमधूनही तीव्र प्रतिक्रिया नोंदवण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने यामध्ये अपयश पत्करले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पदाचा राजीनामा द्यावा.
मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आल्या. या वेळी शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, शरद कोळी, संतोष धोबी, पप्पू जोशी, सुनील बारी, योगेश चौधरी, विनोद कोळी, सारंग बेहेडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.