खासगी बस दरीत कोसळून चालकाचा मृत्यू – १० प्रवासी बचावले

0
40

पुणे : प्रतिनिधी

पुण्याहून भोरमार्गे कोकणात जाणाऱ्या मिनी बसचा वरंधा घाटात भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने नीरा देवघर धरणाच्या बॅक वॉटर परिसरात बस खोल दरीत कोसळली. त्यात चालकाचा मृत्यू झाला तर सर्व १० प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे.बस कोसळली तिथून अवघ्या ५ फुटांवर नीरा देवघर धरणाचे खोल पाणी होते मात्र बस झाडाझुडपात अडकल्यानेे मोठा अनर्थ टळला आहे.स्थानिक तरुणांनी जीवाची बाजी लावून प्रवाशांचा जीव वाचवल्याचे वृत्त समोर आले आहे.
घाटामध्ये असलेल्या रस्त्यांना सुरक्षा कठडे नाहीत. रस्त्यावर नवीन येणाऱ्या चालकांना याचा अंदाज येत नाही. या कारणामुळे गेल्या काही दिवसात या रस्त्यावर अनेक अपघात झालेले दिसून येत आहे. हा अपघात इतका भयानक होता की मिनी बस ५० फूट खोल दरीत कोसळली.सुदैवाने बसमधील १३ ही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. बस दरीत कोसळताना झाडाझुडपात अडकल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातातील जखमींना भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here