राज्य मंत्रीमंडळातल्या भ्रष्टाचारी नऊ मंत्र्यांंचा राजीनामा घेण्याची तयारी सुरू

0
12

मुंबई : प्रतिनिधी

शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. शिवसेना शिंदे गट,भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेक नेते मंत्रीपदाची माळ गळ्यात कधी पडणार याची आस बाळगून बसले आहेत.मंत्रीमंडळ विस्तार झाला तरी कोणत्या नेत्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. अशातच आता महाविकास आघाडीच्या एका नेत्याने मोठा दावा केला आहे. मंत्रीमंडळातल्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या ९ मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची तयारी सुरू झाली असल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

मुश्रीफांचा राजीनामा घ्या
राज्यातील ९ मंत्री भ्रष्टाचारी आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर हे नऊ मंत्री मंत्रिमंडळात दिसणार नाहीत असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदविलेमुळे हसन मुश्रिफांचा सरकारने तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

नवाब मलिक अजित पवार गटात
दरम्यान, राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड पाहिला मिळत आहे.राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा जाहीर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.निवडणूक आयोगाच्या सुनावणी अजित पवार गटाने आपल्यासोबत ४२ आमदार असल्याचा दावा केला होता.त्यामुळे तो बेचाळीसावा आमदार कोण याचीच चर्चा सुरु झाली होती. नवाब मलिक यांना तुरुंगातून बाहेर काढण्यात सत्तेत असलेल्या अजित पवारांचा मोठा वाटा असल्याची चर्चाही आहे.कालच अजित पवार गटाच्या समीर भुजबळांनीही मलिकांंची भेट घेतली होती. तेव्हा ते बेचाळीसावे आमदार नवाब मलिक असल्याचीच चर्चा आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here