bribe : सहाशे रूपयांत अभियंत्यासह तिघांना प्लंबरने एसीबीशी जोडले !

0
27

सहाशे रूपयांत अभियंत्यासह तिघांना प्लंबरने एसीबीशी जोडले !

भुसावळ प्रतिनिधी

प्लंबर परवान्याच्या नूतनीकरणासाठी सातशे रूपयांची लाच मागून तडजोडीवर सहाशे रूपये स्वीकारण्याचा मोह भुसावळ नगरपालिकेच्या पाणी पुरवठा अभियंत्यासह लिपीक व कंत्राटी कर्मचाऱ्याला भोवला त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

शहरातील एका प्लंबरचा परवाना संपल्याने नूतनीकरणासाठी ते नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागात गेले होते. येथे कंत्राटी कर्मचारी शाम साबळे याने त्यांना पैसे द्यावे लागतील असे सांगितले. त्याने पाणी पुरवठा अभियंता सतीश देशमुख यांना कॉल केला त्यांनी या कामासाठी सातशे रूपये लागतील असे सांगितले. यावर सहाशे रूपये देण्याचे पंचाच्या समक्ष ठरले.

दरम्यान, साबळे यांनी पाणी पुरवठा विभागातील लिपीक शांताराम सुरवाडे यांना कॉल करून सहाशे रूपये घेण्यासाठी बोलावले. सुरवाडे हे सहाशे रूपये स्वीकारत असतांना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहात अटक केली.

नगरपालिकेचा कंत्राटी कामगार शाम साबळे, पाणी पुरवठा अभियंता सतीश देशमुख आणि लिपीक शांताराम सुरवाडे या तिघांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले त्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. ही कारवाई पोलीस निरिक्षक नेत्रा जाधव, उपनिरिक्षक सुरेश पाटील, दिनेशसिंग पाटील, शैला धनगर, बाळू मराठे, राकेश दुसाने, प्रदीप पोळ यांनी केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here