रायसोनी महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिनाच्या पूर्वसंध्येला ‘म्युझिकल फ्लॅश मॉब’चे आयोजन

0
10

जळगाव : प्रतिनिधी

हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती असलेल्या २९ ऑगस्ट रोजी भारतात राष्ट्रीय क्रीडादिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या अनुषंगाने या दिनाचे औचित्य साधून सोमवारी राष्ट्रीय क्रीडादिनाच्या पूर्वसंध्येला रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात ८५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी खेळाडूंच्या सन्मानार्थ ‘बियाँड द बाउंड्रीज स्पोर्ट वारीयर्स ‘ या विषयावर आधारित एक म्युझिकल ंॅश मॉब सादर केला.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तब्बल १५ मिनिटे सादर केलेल्या या कार्यक्रमात विविध क्रीडा गीतांवर नृत्ये प्रस्तुत करण्यात आली. यावेळी महाविद्यालयात आलेल्या विद्यार्थी, पालक व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने हा कार्यक्रम बघितला व टाळ्यांचा वर्षाव करत वातावरणातील उत्साह वाढवला. आपल्या देशाचे नाव उंचवनाऱ्या खेळाडूविषयीचे प्रेम व अभिमान सर्व प्रेक्षकांच्या चेहऱ्यांवर स्पष्ट दिसून येत होते. विद्यार्थ्यांनी आपल्या देशातील खेळाडूंची महानता आणि समृद्ध वारसा याविषयी माहिती देत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. सर्वांच्या मनाला भिडणाऱ्या ‘जय हिंद’ या जयघोषाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here