साईमत लाईव्ह चाळीसगांव प्रतिनिधी
महाराष्ट्र भूषण,तीर्थरूप डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त चाळीसगाव शहरातील शाळा क्रमांक 11 मधील शहीद हेमंत जोशी क्रीडांगणाच्या मैदानावर रविवार दिनांक 24 रोजी डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने वृक्ष लागवड व संवर्धन मोहीम राबविण्यात आली. एकाच दिवशी या मैदानावर शेकडो श्री सदस्यांच्या उपस्थितीत 130 वृक्ष लागवड करण्यात आले.
प्रतिष्ठानच्या वतीने शहरात 200 हून अधिक झाडे लावण्यात येणार आहेत. या सर्व झाडांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी देखील प्रतिष्ठानने घेतली आहे. या कामासाठी नगरपालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, मुख्यालिपीक सचिन निकुंभ, संजय गोयर यांच्यासह संपूर्ण पालिका प्रशासनाचे योगदान व सहकार्य लाभले. वृक्ष लागवड मोहिमेसाठी सकाळी 11वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत शेकडो श्री सदस्यांनी श्रमदान करून झाडे लावा,झाडे जगवा हा संदेश देण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी देखील पालिका प्रशासनाकडे डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने लागवड केलेली मोठ-मोठी 300 हून अधिक झाडे पालिका प्रशासनाकडे हस्तांतरित केली आहेत.या उपक्रमाचे चाळीसगाव शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमाला माजी नगरसेवक सुरेश स्वार तसेच सेवानिवृत्त शिक्षक मो.रा.अमृतकर यांनी भेट दिली.