मलकापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील कुंड येथील लहान मुले खेळत असतांना एका महिलेने त्यांना जेट्रोफाच्या बिया खायाला दिल्या. त्यानंतर त्यांना विषबाधा झाली. ही घटना काल घडली.
विषबाधा झालेल्यांमध्ये सोहम नीना तायडे (वय १०), दिव्या संतोष कांडेलकर (वय १०), भाग्यश्री श्रीकृष्ण कांडेलकर (वय १०, नम्रता सुरेश सुरडकर (वय ८), रिया सुरेश बावस्कर (वय ६), वैष्णवी रमेश बावस्कर (वय१०), श्रेयश अशोक कांडेलकर (वय ८), श्रेया रमेश बावस्कर(वय ५), समर्थ सुरेश बावस्कर (वय अडीच वर्ष) अशा नऊ मुलांचा समावेश आहे.
विषबाधा झाल्याने त्यांना मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.