राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे विधानसभा उपाध्यक्षपदी

0
47

 

राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे विधानसभा उपाध्यक्षपदी

मुंबई ( प्रतिनिधी)-

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या पदासाठी केवळ महायुतीच्यावतीने बनसोडे यांचा अर्ज आला होता.
आज दुपारी त्यांच्या निवडीचा प्रस्ताव आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुमोदन दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले.

विधानसभा उपाध्यक्षपदासाठी पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचे नाव चर्चेत होतेच मात्र त्यांशिवाय लातूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बनसोडे, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले या तिघांची नावे चर्चेत होती.

अण्णा बनसोडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. ते २००९ मध्ये पहिल्यांदा आमदारपदी निवडून आले होते. त्यानंतर २०१९ आणि २०१४ असे सलग दोनवेळा आमदारपदी विराजमान झाले. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर ते अजित पवार यांच्यासोबत राहिले, आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनी बाजी मारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here