Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»नाशिक»नाशिक कुंभमेळा सिंहस्थ समिती अध्यक्षपदाचा मान गिरीश महाजनांना
    नाशिक

    नाशिक कुंभमेळा सिंहस्थ समिती अध्यक्षपदाचा मान गिरीश महाजनांना

    Kishor KoliBy Kishor KoliDecember 15, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : प्रतिनिधी
    दर बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा यंदा २०२६- २७ मध्ये भरणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला होत असलेल्या या कुंभ मेळ्यासाठी शासनाच्या वतीने चार समित्या घोषित करण्यात आल्या आहेत. या जिल्हास्तरीय समितीमध्ये पालकमंत्री दादा भुसे ऐवजी राज्याचे ग्रामविकास आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पुर्वानुभव पहाता अध्यक्ष पदाची सुत्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे.
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती असून त्यात अठरा सदस्यांचा समावेश असेल. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपाध्यक्ष तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सदस्य असतील. यानंतर उच्च अधिकार समितीही राज्यस्तरावर असणार आहे तर जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय समिती आणि त्या खालोखाल जिल्हास्तरीय कार्यकारी समिती असणार आहे. कार्यकारी समितीत केवळ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, जिल्हास्तरीय समिती गठित करताना पालकमंत्री दादा भुसे यांच्या ऐवजी ग्रामविकास आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना स्थान देण्यात आले आहे. पालकमंत्री दादा भुसे यांना सहअध्यक्ष करण्यात आले आहे. नाशिकचे माजी पालकमंत्री आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच विद्यमान पालकमंत्री दादा भुसे यांच्यात फारसे सख्य नसून त्यामुळेच मधला मार्ग म्हणून गिरीश महाजन यांना समितीचे अध्यक्षपद देण्यात आल्याची ही चर्चा आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026

    Nashik : ५८४ सरपंचांना नाशिक जिल्ह्यात प्रशासक म्हणून अधिकार बहाल, गावात हलवले नवचैतन्य!

    March 5, 2026

    Nashik Crime : बदलापूर स्त्रीबीज रॅकेटचा धागा नाशिकपर्यंत; ‘मालती आयव्हीएफ सेंटर’च्या संचालकाला अटक

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.