बोदवड : प्रतिनिधी
येथील जागृत मरीमाता देवस्थान शैक्षणिक सांस्कृतिक संस्था आर.एस.आर्ट स्टुडिओ आर्ट गॅलरी मुंबई यांच्या सहकार्याने देविदास राखुंडे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सव, विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना संस्थेमार्फत राबविण्यात आलेल्या नारीशक्ती सन्मान पुरस्कार व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरणाचा सोहळा बोदवड येथील सावरिया लोन खंडेलवाल पेट्रोल पंपाजवळ नुकताच झाला. यावेळी आ.चंद्रकांत पाटील, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके उपस्थित होते. सोहळ्यात बोदवड येथील २० आशा वर्कर, १२ अंगणवाडी सेविका, ७ नगरसेविका यांचा तर मुंबई येथील २८ महिलांचा सन्मान तर ५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष आनंदा पाटील, उपनगराध्यक्षा रेखा गायकवाड, न.ह.राका हायस्कूलचे मुख्याध्यापक पी.एम.पाटील, अनिल खंडेलवाल, संस्थेचे संस्थापक देविदास राखोंडे, अध्यक्ष निवृत्ती राखोंडे, उपाध्यक्ष संतोष तेली, आंतरराष्ट्रीय चित्रकार स्वाती यश राखोंडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.राजेंद्र फडके, आ.चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यांचा झाला गौरव
मुंबई येथील २८ महिलांमध्ये चिखली, ता.बोदवड येथील मर्चंट नेव्ही अधिकारी वैष्णवी पाटील, मुंबई येथील प्रोफेशनल आर्टिस्ट अलिफिया दारूवाला, मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक सुप्रिया नटे, नाशिक येथील सोशल वर्कर चेतना सेवक, मुंबई येथील मॅक्सी लोकेशन सर्जन डॉ.वैशाली दास, मुंबई येथील न्यू आर्टिस्ट के.मोहन, जळगाव येथील शिक्षण व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या भाग्यश्री तायडे, बोदवड येथील शिक्षिका सविता कपले, जळगाव येथील मेकअप आर्टिस्ट तथा स्किन स्पेशालिस्ट मंगल विरा कुलट यांच्यासह इतर २८ महिलांचा प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ, ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी सुनील बोरसे, सर्व नगरसेवक, धनराज राखोंडे, पी.एन.चौधरी, रवींद्र मराठे, ‘राम रोटी आश्रम’चे पदाधिकारी किरण महाजन, जीवन माळी, निलेश इंगळे, राहुल घाटे, भावेश बोरसे, खुशाल राखोंडे, तुषार वाघचौरे, पिंटू कारले, लता वाघचौरे, भिका नन्नवरे, अंबादास राखोंडे, सुरेश माळी यांनी परिश्रम घेतले. राखुंडे परिवाराच्या उपक्रमाचे उपस्थित सर्वांनी कौतुक केले. सूत्रसंचालन यशोदास राखुंडे, मंजुषा अडावदकर यांनी केले.