सुवर्णपदकावर कोरलं नाव

0
51

हांगझोऊ : वृत्तसंस्था

चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील बीडच्या सुपुत्राने सुवर्णमय कामगिरी केली आहे. अविनाश साबळे यांने आशियाई स्पर्धेत इतिहास रचला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. अविनाश साबळेच्या या यशाने भारताला आणखी एका सुवर्णपदकावर नाव कोरता आले आहे. अविनाश साबळे याने काही महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये रौप्य पदक मिळवले होते. यावेळी आशियाई स्पर्धेत तो सुवर्णपदक मिळवेल अशी आशा सर्व भारतीयांना होती. चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्णपदकावर नाव कोरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here