वरणगाव फॅक्टरी बसस्थानक परिसरात किरकोळ वादातून एकाची हत्त्या : संशयित आरोपीला अटक

0
26

वरणगाव ता.भुसावळ : प्रतिनिधी

वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथे एका इसमाची क्षुल्लक कारणावरून हत्या झाल्याची घटना रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली . या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी(दि.१५) सकाळी वरणगाव फॅक्टरी बसस्थानक परीसराच्या दर्यापूर शिवारातील एका हॉटेलवर प्रमोद ज्ञानेश्वर महाजन( वय ५५) रा. टहाकळी ता.भुसावळ ह.मु.शिवाजीनगर वरणगांव हे सकाळी दहा वाजेच्या सुमारास नाश्ता करण्यासाठी गेले होते.त्या ठिकाणी वरणगांव फॅक्टरीचे कर्मचारी दिपक कृष्णकुमार सिंग यांचेशी त्यांचा किरकोळ वाद झाल्यानंतर दिपकसिंग यांनी घरी जाऊन आणलेल्या लाकडी दांडक्याने खुर्चीवर बसलेल्या प्रमोद महाजन यांच्या डोक्यावर जबर वार केला.या हल्ल्यात प्रमोद महाजन हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नितीन सोनवणे व मनोहर महाजन यांनी वरणगांव फॅक्टरीत उपचारार्थ हलविले मात्र तेथील डॉ. राजरत्न तायडे यांंनी प्रमोद महाजन यांना मृत घोषित केले.या घटनेची माहिती मिळताच वरणगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषकुमार आडसुळ व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच या घटनेप्रकरणी मयताचे चुलत काका मनोहर ओंकार महाजन यांच्या फिर्यादीवरून वरणगांव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासात दिपकसिंग याला पोलीसांनी अटक केली. घटनास्थळी वरीष्ठ पोलिस अधीक्षक व इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.मृत प्रमोद महाजन यांच्या पश्चात आई – वडील, पत्नी व दोन मुले आहेत .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here