Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई, मावशीचाही बुडून मृत्यू
    क्राईम

    मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई, मावशीचाही बुडून मृत्यू

    Vikas PatilBy Vikas PatilApril 15, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई, मावशीचाही बुडून मृत्यू

    यावल (प्रतिनिधी)-

    तालुक्यातील अंजाळे येथे तापी नदीपात्रात बुडणाऱ्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याची आई व मावशी यांच्यासह तीन जण बुडून मरण पावल्याची हृदयद्रावक घटना घडल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.

    अंजाळे येथील घाणेकरनगरात बादल भील हा तेवीस वर्षाचा युवक वास्तव्याला असून तो जेसीबी ऑपरेटर म्हणून काम करतो. काल खंडोबाचा जागरण गोंधळ असल्याने त्यांच्या बहिणींसह आप्त आलेले होते. त्यांची मावस बहिण वैशाली भील ( रा. अंतुर्ली, ता. अमळनेर ) आणि मामेबहिण सपना सोनवणे (रा. पळाशी, ता. सोयगाव ) यांचा समावेश होता. काल जागरण गोंधळ झाल्यानंतर दुपारी ते तापी नदीवर आंघोळीसह कपडे धुण्यासाठी गेले. वैशाली भील यांचा मुलगा नकुल ( वय वर्षे पाच ) अचानक पाय घसरून पाण्यात पडल्याने गटांगळ्या खाऊन बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी आई वैशाली भील आणि मावशी सपना सोनवणे यांनी उडी घेतली. या दोन्ही जणींनादेखील पोहता येत नसल्याने हे तिन्ही जण पाण्यात बुडाले.

    त्यांच्यासोबत नदीवर गेलेल्या अनु सतीश भील या बालिकेने घरी धावत येऊन याची माहिती दिली. यानंतर पोहणाऱ्यांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना पाण्याबाहेर काढले. मात्र तोवर त्यांचा मृत्यू झाला होता. तिघांचा मृत्यू झाल्याने अंजाळे गावावर शोककळा पसरली आहे. यावल पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Chalisgaon: बसस्थानकावरील गर्दीत महिलेचे ४० हजारांचे मंगळसूत्र लंपास

    March 2, 2026

    Akulkheda (Tal. Chopra) :रागाच्या भरात प्रेयसीवर गोळी; नंतर प्रियकराची आत्महत्या

    March 1, 2026

    Jalgaon : मेहरूणमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना

    March 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.