Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»मोदी सरकार फक्त ग्राहकांचा विचार करते, शेतकऱ्यांचा नाही
    राज्य

    मोदी सरकार फक्त ग्राहकांचा विचार करते, शेतकऱ्यांचा नाही

    Kishor KoliBy Kishor KoliAugust 22, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पिंपरी : वृत्तसंस्था
    केंद्र सरकार केवळ सत्ता टिकवण्याचा विचार करत आहे. सरकार नामर्दासारखे वागत आहे.केवळ सत्तेसाठी ग्राहकाचा, खाणाऱ्याचा विचार केला जातो मग पिकवणाऱ्या विचार का केला जात नाही. सरकारने ही नालायक वृत्ती सोडली पाहिजे, अशा घणाघाती शब्दांत आमदार बच्चू कडू यांनी मोदी सरकारवर प्रहार केला.
    कांद्यावर लादण्यात आलेले ४० टक्के निर्यातशुल्क आणि किरकोळ बाजारपेठेत कांद्याच्या वाढलेल्या दरावरुन सध्या राज्यात प्रचंड गदारोळ सुरु आहे. पिंपरी येथे ‘दिव्यांग विभाग आपल्या दारी’या कार्यक्रमासाठी आलेल्या बच्चू कडू यांनी या सगळ्या परिस्थितीवर सविस्तरपणे भाष्य केले.यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार ताशेरे ओढले.
    ज्या लोकांना कांदा परवडत नसेल त्यांनी लसुण किंवा मुळा खाण्यात काही गैर नाही. केंद्र सरकार कांद्याचे दर वाढल्यावर हस्तक्षेप करते. मग भाव कमी झाल्यानंतर सरकार हस्तक्षेप का करत नाही?, असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित
    केला.
    काही दिवस कांदा खाल्ला नाही तर कोणी मरणार नाही.केंद्र सरकारला कांद्याच्या निर्यातीवर शुल्क लावण्याची गरज नव्हती.ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कांद्याचे भाव वाढू नयेत, यासाठी सरकारने आतापासूनच तयारी करुन ठेवली आहे. सरकार इतका नालयाकपणा का करत आहे? अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात कांद्याच्या भावावारुन सरकार पडले होते. पण त्यामुळे केंद्र सरकारने इतके घाबरण्याची काय गरज आहे? मोदीजी ‘मेक इन इंडिया, मेड इन इंडिया’चा नारा देतात.
    मग या इंडियातील माल परदेशात कसा जाईल, ही त्यांची भूमिका असली पाहिजे. कांदा परदेशात गेला तर त्याला सफरचंदाचा भाव मिळेल. त्यासाठी केंद्र सरकारने निर्यात धोरणात स्पष्टता आणली पाहिजे. तसे केल्यास आम्ही एकही जागा न मागता केंद्र सरकारला पाठिंबा देऊ, असे बच्चू कडू यांनी म्हटले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Budget 2026 : अर्थसंकल्प 2026: निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; स्वस्त काय, महाग काय?

    February 1, 2026

    महापौरपदाची लॉटरी! २९ महापालिकांच्या आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष

    January 19, 2026

    Big Breaking! राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; जि.प.–पं.स. निवडणुकीची रणधुमाळी सुरू

    January 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.