अल्पवयीन मुलीवर ११ दिवस अत्याचार
चाळीसगाव (प्रतिनिधी )-
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे तोड दाबून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेहुणबारे पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबासह वास्तव्याला आहे. २६ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरच्या कालावधीमध्ये संशयित आरोपी दत्तू दिलीप मोरे (रा. मेहुणबारे ता.चाळीसगाव ) यांने पीडित मुलगी एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिच्या राहत्या घरात तिच्यावर अत्याचार केला आहे. इतर दिवशीदेखील शेतात आणि इतर भागात देखील धमकी देऊन अत्याचार केला .
पीडित अल्पवयीन मुलीने हा प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला. त्यानुसार शनिवारी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहेत.