वैद्यकीय शिक्षण आता मराठीतून

0
8

वैद्यकीय शिक्षण आता मराठीतून

मुंबई (प्रतिनिधी)-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरातील माधव नेत्रालय प्रीमियर सेंटरच्या नवीन इमारतीची पायाभरणी करण्यात आली. नागपूरच्या दौऱ्यावर असलेल्या मोदींनी विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात करत नागरिकांना गुढीपाडवा आणि नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. वैद्यकीय शिक्षण मराठीतून उपलब्ध करून देण्याची घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेता यावे यासाठी मातृभाषेत वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. यामुळे मराठी भाषिक विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळेल.

मोदींनी सांगितले की, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाखो नागरिकांना मोफत उपचार मिळत आहेत. देशभरात एक हजार डायलिसीस सेंटर स्थापन करण्यात आली आहेत नागरिकांचे हजारो कोटी रुपये वाचत आहेत. एम्स संस्थांची संख्या वाढवण्यात आली असून वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींनी नागपुरातील स्मृति मंदिराला भेट देऊन डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी भगवान झुलेलाल आणि गुरु अंगद देव यांच्या अवतरण दिनाचे स्मरण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here