सोलापूर : वृत्तसंस्था
मराठा समाजाचा जीवन चितेप्रमाणे राख झाला आहे. ही राख करणाऱ्या राज्य सरकारच्या निषेधार्थ आणि मनोज जरांगे यांचे समर्थनार्थ आणि सरसकट मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी तरुणाने जिवंतपणी समाधी घेतली आहे.समाधी आंदोलन बेमुदत असल्याच छावा संघटनेच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय छावाचे प्रदेशाध्यक्ष निखिल गोळे आणि प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष रतिकांत पाटील हे सरणावर झोपून तळे हिप्परगा येथील मराठा हिंदू स्मशानभूमीमध्ये बेमुदत जिवंत चिता समाधी आंदोलनाला सुरुवात केली आहे.मराठा समाजाच्या तरुणाने आरक्षणासाठी स्वतःची जिवंतपणी अंत्ययात्रा काढून राज्य सरकारचा निषेध केला आहे.
सत्तर वर्षांपासून मराठा समाजाला कोणतेही शासकीय लाभ, सवलती किंवा फायदे मिळाले नाहीत. आरक्षणा अभावी मराठा समाज अन्य जातींच्या तुलनेत शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासापासून खूपच मागे पडलेला आहे. मराठा समाजाला संवैधानिक आणि घटनात्मकरित्या टिकणारे ओबीसी आरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली. केंद्र आणि राज्य शासन मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत सातत्याने उदासीन भूमिका घेत आहे.
राष्ट्रीय छावा संघटनेच्यावतीने प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष निखिल गोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्र आणि राज्य शासनाचा निषेधार्थ व मनोज जरांगे यांचे समर्थनार्थ आणि सरसकट मराठा जातीचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी छावाचे तालुकाध्यक्ष रतिकांत पाटील हे तळे हिप्परगा येथील मराठा हिंदू स्मशानभूमीमध्ये जिवंतपणी चिता समाधी घेवून बेमुदत आंदोलनास बसले आहेत. समाधी आंदोलन सुरू करण्याअगोदर जीवंतपणी अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातील शेकडो मराठा बांधव जिवंत अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.
बेमुदत चिता समाधी
मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन बेमुदत काळाकरिता चालू राहणार आहे. यावेळी चिता आंदोलकर्ते रतिकांत पाटील यांना पाठींबा देण्यासाठी छावाचे निखिल गोळे, योगेश पवार, विशाल भोसले, अंकुश पाटील, नीतेश दातखिळे, अमर सुपे, संदीप सिंग, संजय पारवे, विश्वजित चुंगे, गणेश मोरे यांसह मराठा समाज व तळे हिप्परगा ग्रामस्थ, जोशी समाज, लिंगायत समाज, गोसावी समाज, बौध्द समाज, वडार समाज, कोळी, पारधी आणि मुस्लिम बांधव उपस्थित होते.