Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»मुंबई इंडियन्सच्या संघात मलिंगाचे पुनरागमन
    क्रीडा

    मुंबई इंडियन्सच्या संघात मलिंगाचे पुनरागमन

    Kishor KoliBy Kishor KoliAugust 20, 2023Updated:August 20, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    इंडियन प्रीमियर लीग २०२४ साठी लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्सच्या संघात परतला आहे. मलिंगा जेव्हा खेळत असे तेव्हा तो मुंबई इंडियन्सच्या संघातील महत्त्वाचा गोलंदाज होता. मलिंगाच्या गोलंदाजीवर सगळेच फिदा होते. आता हाच मलिंगा त्याच्या जुन्या संघासोबत पुन्हा एकदा आयपीएल २०२४ मध्ये दिसणार
    आहे.
    कोणती जबाबदारी मिळाली?
    लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्सच्या संघात वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील होत आहे.तो मुंबई इंडियन्समध्ये न्यूझीलंडचा क्रिकेटर शेन बाँडची जागा घेणार आहे. यापूर्वी तो राजस्थान रॉयल्सशी संबंधित होता.राजस्थान रॉयल्समध्ये वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली होती.सपोर्ट स्टाफ म्हणून मुंबई इंडियन्ससोबत मलिंगाचा हा दुसरा कार्यकाळ असेल. याआधी २०१८ मध्येही तो मुंबईच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील होता. तो मुंबईसाठी मेंटॉरच्या भूमिकेत होते.
    मुंबई इंडियन्ससाठी मलिंगाची कामगिरी
    तथापि, २०१८ मध्ये मार्गदर्शक बनल्यानंतर, तो पुढच्या हंगामात एक खेळाडू म्हणून मुंबईत परतला आणि जसप्रीत बुमराहच्या साथीने २०१९ मध्ये संघाला चॅम्पियन बनवले.मलिंगा मुंबई इंडियन्ससाठी चार (२०१३, २०१५, २०१७, २०१९) आयपीएल विजेतेपदांमध्ये संघाचा भाग होता.याशिवाय तो २०११ च्या चॅम्पियन्स लीग टी-२० विजेत्या संघाचाही भाग होता. मलिंगाने मुंबई इंडियन्ससाठी एकूण १३९ सामन्यांमध्ये ७.१२ च्या इकॉनॉमी रेटने १९५ विकेट घेतले. यापैकी १७० विकेट आयपीएलमध्ये त्याने मिळवल्या, जे लीगमधील सर्वाधिक विकेट्सच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    India vs England Semi-Final: उपांत्य फेरीत टीम इंडियाचा प्लेइंग 11 निर्णय, बेंचवर बसणार हे चार महत्त्वाचे नाव

    March 5, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026

    Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड

    January 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.