स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राची बाजी

0
29

मुंबई : प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ च्या राज्याच्या यादीत महाराष्ट्राने पहिला क्रमांक मिळवला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला ‘बेस्ट परफॉर्मन्स स्टेट’ च्या प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भातील पोस्ट मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून दिली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राला मिळालेल्या या यशाबद्दल राज्यातील जनता, महानगरपालिका, सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतींचे अभिनंदन केले आहे. ‘महाराष्ट्रातील स्वच्छता प्रेमी नागरिकांच्या योगदान आणि सफाई, स्वच्छता कामगारांच्या मेहनतीमुळे आपण हे अव्वल स्थान पटकावले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. स्वच्छ अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी राबणारे हातच या यशाचे खरे हिरो असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी या यशामध्ये मोलाचे योगदान देणारे स्वच्छता कर्मचारी आणि सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे या यशासाठी अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
जळगाव जिल्ह्यातीलही पालिकांनीही स्वच्छतेबाबत आपला दर्जा सुधारला आहे. जिल्ह्यातील १४ पालिकांना गेल्या वर्षाच्या तुलनेत चांगले रेटींग मिळाले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here