लेवा पाटीदार प्रिमीअर लिगकडून महिला , पुरूषांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

0
12

लेवा पाटीदार प्रिमीअर लिगकडून महिला , पुरूषांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) –

जळगाव लेवा पाटीदार प्रीमिअर लीग आयोजित कवयित्री बहिणाबाई महिला बॉक्स क्रिकेट लीग, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल पुरुष बॉक्स क्रिकेट लीगचे २८ ते ३० मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.

२८ मार्च रोजी सायंकाळी क्रिकेट लीगचे उदघाटन केले जाईल. शिरसोली रोडवरील रॉयल टर्फ येथे सामने भरविण्यात येणार असून केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे ब्रँड अँबेसिडर आहेत. या स्पर्धेल पुरुष व महिला या दोन्ही गटासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि उत्तेजनार्थ अशी स्मृतीचिन्हे दिली जाणार आहेत.

पहिल्यांदाच महिलांसाठी बॉक्स क्रिकेट लीग आयोजित करण्यात आली आहे. आयोजकांनी दिलेल्या  प्रोत्साहनामुळे आणि भगिनींच्या भक्कम साथीमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे, हे या स्पर्धेचे वैशिष्ट्ये आहे.

या स्पर्धेच्या उद्‌घाटनाप्रसंगी माजी मंत्री आमदर एकनाथराव खडसे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार अमोल जावळे, माजी आमदार शिरीष चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेसाठी गोदावरी फाऊंडेशन संचलित महादेव हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. केतकी पाटील, आमदार राजूमामा भोळे, माजी महापौर ललित कोल्हे, एसव्हीपीएल सोलरचे संचालक हिमांशू इंगळे, डॉ. पंकज पाटील, डॉ. मनीष चौधरी, डॉ. जितेंद्र ढाके, महेश चौधरी, दीपक पाटील, चेतन पाटील, दीप्ती ढाके, जयेश नारखेडे, डॉ. वैभव पाटील, सोहम खडके, भूषण चौधरी, गौतम चौधरी, डॉ . गौरव महाजन, निलेश चौधरी, हरीश कोल्हे, आशुतोष पाटील, तेजस रडे, योगेश खडके, जयेश भंगाळे, माधुरी अत्तरदे, सूचिता चौधरी, प्रीती महाजन, राधा कोल्हे, गायत्री राणे, पल्लवी चौधरी, पूजा महाजन, शर्वरी काळे, गायत्री महाजन, पूजा सरोदे, अमित भंगाळे आदींचे सहकार्य लाभले आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here