महान फिरकीपटू बिशनसिंग बेदींचे निधन

0
46

अमृतसर : वृत्तसंस्था

भारतामध्ये वर्ल्ड कप २०२३ चं आयोजन करण्यात आलेले ेअसून सध्या देशातील मोहोल क्रिकेटमय आहे. असे असतानाच महान फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांचे निधन झाले आहे.१९७० च्या दशकामध्ये आपल्या फिरकी गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या ग्रेट चौघांमध्ये बिशन सिंग बेदी यांचा समावेश होता. बिशन सिंग बेदींबरोबरच प्रसन्ना, चंद्रशेखर आणि व्यंकटराघवन यांचा या सर्वोत्तम ४ फिरकीपटूंमध्ये समावेश होता.बिशन सिंग बेदींचा जन्म २५ सप्टेंबर १९४६ अमृतसरमध्ये झाला. भारतीय कसोटी क्रिकेट संघात बिशन सिंग बेदी १९६६ ते १९७९ दरम्यान खेळले.बिनश सिंग बेदींनी २२ कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून भारताचे नेतृत्व केले.आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारर्किर्दीमध्ये त्यांनी १५६० विकेट्स घेतल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here