कोहली-राहुलच्या शतकी भागीदारीने ६ गडी राखून ऑस्ट्रेलियाला नमवले

0
35

चेन्नई : वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची ३ बाद ० अशी दयनीय अवस्था होती. पण विराट कोहली आणि लोकेश राहुलमुळेच भारताला विजय साकारता आला. कोहली आणि राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली आणि भारताला वर्ल्ड कपमधील पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब करता आले. कोहली ८५ धावांवर बाद झाला. पण राहुलने अखेरपर्यंत किल्ला लढवला आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने हा सामना ६ विकेट्‌‍स राखून जिंकला.
भारताला इशान किशानच्या रुपात पहिल्या षटकात धक्का बसला होता. भारताला दुसरा धक्का बसला तो रोहित शर्माच्या रुपात. शर्माला जोश हेझलवूने पायचीत पकडले श्रेयस अय्यरलाही भोपळा फोडता आला नाही आणि भारताला तिसरा धक्का बसला.
या विकेट जेव्हा पडल्या तेव्हा भारताची एकही धाव झाली नव्हती. कोहलीला योळी १२ धावांवर असताना जीवदान मिळाले. कोहली १२ धावांवर असताना ८ व्या षटकात त्याचा झेल मिचेल मार्शने सोडला आणि तिथेच ऑस्ट्रेलियाच्या हातून मॅच निसटल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर कोहलीने कोणतीही जोखीम घेतली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here