जुन्या वादातून चाकूहल्ला; तिघांवर गुन्हा

0
37

जुन्या वादातून चाकूहल्ला; तिघांवर गुन्हा

जळगाव ( प्रतिनिधी )-

शहरातील बजरंग बोगदा भागातील गणपती मंदिराजवळ जुन्या भांडणातून तरुणावर चाकूने वार करून पाठीला दुखापतीसह लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना २२ मार्चरोजी रात्री घडली. २३ मार्चरोजी दुपारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोहित गुजर (वय १८) हा परिवारासह मयूर कॉलनी, पिंप्राळा येथे वास्तव्याला आहे. २२ मार्चरोजी रात्री मोहित बजरंग बोगद्याजवळ गणपती मंदिरासमोर जात असताना संशयित गणेश मराठे याने दोन साथीदारांसोबत जुन्या भांडणावरून मोहितवर चाकूने वार करून जखमी केले. इतर दोघांनी लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली. तपास पो ना राजेश पदमर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here