दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी कर्णधारपदाची धुरा के.एल.राहुलकडे?

0
4

नवीदिल्ली : वृत्तसंस्था

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा होणार आहे. यासाठी कर्णधारपद के एल राहुलला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचे संकेत त्यानेच दिले आहे. के एल राहुलने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा १० डिसेंबरपासून सुरू होत आहे. यात भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. पहिल्या सामन्याला दोन आठवडेही शिल्लक नाहीत. अद्याप टीम इंडियाची घोषणा झाली नाही. मात्र आता टीम इंडियाची घोषणा लवकरच होणार आहे. यासाठी बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि आगरकर यांची लवकरच भेट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान या सामन्यासाठी कर्णधार म्हणून कोणाची निवड करणार यावर चर्चा होत आहेत.भारताचा टी-२० कर्णधार हार्दिक पांड्या जखमी झाला आहे. तर घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-२० मध्ये सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करत आहे.आत्तापर्यंत, सूर्या आणि रोहित ही दोन नावे आहेत ज्यांची दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कर्णधारपदासाठी निवड होऊ शकते. एकदिवसीय आणि कसोटीत रोहित पूर्णवेळ कर्णधार म्हणून पुनरागमन करण्याची शक्यता आहे. मात्र अशातच के एल राहुलने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात त्याने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कर्णधारपद कोणाकडे येणार याचे संकेत दिले आहे.
विराट कोहलीने वनडे आणि टी-२० मालिका खेळण्यास नकार दिला आहे. तर पांड्या दुखापतीमुळे बाहेर आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुलला टी-२० चे कर्णधारपद मिळू शकते. तसेच रोहित शर्मा टीम इंडियात पुनरागमन करू शकतो. राहुलने याबाबत एक प्रोमोही बनवण्यात आला आहे. तो त्याने त्याच्या सोशल मिडियावर शेअर केला आहे. यावरुन स्पष्ट झाले आहे की, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कर्णधारपद हे के एल राहुलला मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here