jio ने भारतात अद्याप ५जी सर्व्हिस सुरू केलेली नाही. मात्र, ६जी वर काम करणे सुरू केले आहे. जिओची सबसिडियरी Estonia ने ६जी टेक्नोलॉजीवर रिसर्च करण्यास सुरुवात केली आहे. Jio Estonia या प्रोजेक्टवर University of Oulu सोबत मिळून काम करत आहे.
कंपनीने अद्याप याबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. कंपनी University of Oulu सोबत मिळून ६जी टेक्नोलॉजीच्या फ्यूचर वायरलेस end-to-end सॉल्यूशनवर काम करत आहे.
कंपनीने सांगितले की, या भागीदारीमुळे एरियल आणि स्पेस कम्यूनिकेशन, होलोग्राफिक बीमफॉर्मिंग, सायबर सिक्योरिटी, मायक्रो-इलेक्ट्रॉनिक आणि फोटोनिक्समध्ये ३डी कनेक्टेड इंटेलिजेंसला इंडस्ट्री आणि अकॅडेमीमध्ये प्रोत्साहन मिळेल. तसेच, जिओ आणि University of Oulu कंझ्यूमर गुड्स, ऑटोमोटिव्ह आणि वॉइट गुड्स स्पेसमध्ये ६जी फीचरसह येणारे प्रोडक्ट्स तयार करण्यावर काम करेल.
याशिवाय जिओ ६जी चा परिणाम मॅन्यूफॅक्चरिंग, डिफेन्स आणि इंडस्ट्रियल मशिनरीवर देखील पडेल. ५जी पेक्षा ६जी टेक्नोलॉजी चांगली असेल. याचे लक्ष प्रामुख्याने सेल-फ्री MIMO, इंटेलिजेंस सर्फेस, वेगवान स्पीड व चांगली कनेक्टिव्हिटी हा असेल. हे नेटवर्क ५जी सह उपलब्ध होईल व मोठ्या रेंजचे ग्राहक आणि इंटरप्राइजेसला कव्हर करेल.
६जी च्या स्पीडबाबत सध्या कोणताही डेटा उपलब्ध नाही. मात्र, रिपोर्टनुसार याचा स्पीड ५जी पेक्षा १०० पट अधिक असेल. सॅमसंगचा अंदाज आहे की, त्यांच्या नेक्स्ट जनरेशन नेटवर्कचा स्पीड १००० जीबीपीएस असेल.
याच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटचे काम चीन आणि जर्मनी सारख्या देशांमध्ये सुरू झाले आहे. ओप्पोनुसार, ६जी नेटवर्कमुळे लोकांचे एआयद्वारे इंटरॅक्शन करण्याची पद्धत बदलून जाईल. परंतु, वर्ष २०२५ पूर्वी ६जी नेटवर्क उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे.
