Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»जळगावच्या ‘किड्स गुरुकुल’ चा जागतिक स्तरावरील स्पर्धेत डंका
    क्रीडा

    जळगावच्या ‘किड्स गुरुकुल’ चा जागतिक स्तरावरील स्पर्धेत डंका

    Kishor KoliBy Kishor KoliSeptember 6, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी

    लखनऊ येथे नुकतेच झालेेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील १९ व्या जागतिक शांंतता आणि एकता उत्सव ‘कॉनफ्लूएंस २०२३’ मध्ये जळगावच्या किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलने डंका वाजवला आहे.उत्सवातील विविध स्पर्धेत सहभागी झालेल्या २० विद्यार्थ्यांंच्या संघाने तब्बल ७ स्पर्धेत ८ बक्षिसे पटकावली आहेत. विजयी संघ सर्वोत्कृष्ट विजेतेपदाची ट्रॉफी घेऊन जळगावात पोहचताच त्यांचे शाळा व्यवस्थापन व पालकांतर्फे जंगी स्वागत करण्यात आले.
    जगातील सगळ्यात मोठी शाळा म्हणून नावाजलेली लखनऊ येथील सिटी मांॅटेेसरी स्कूलतर्फे ३० ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान डब्ल्यूयूसीसी ऑडिटोरियम लखनऊ येथे १९ व्या जागतिक शांतता आणि एकता उत्सव ‘कॉनफ्लूएंस २०२३’ मध्ये देशविदेशातील अनेक आमंत्रित शाळा स्पर्धेत सहभागी होत असतात. जळगावातील किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलने देखील स्पर्धेत सहभाग घेतला होता. नेहमी अग्रेसर असलेल्या किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यंदा देखील आपल्या विजयाचा नवा मानबिंदू प्रस्थापित केला.
    या उत्सवात आर्टसी लेन्समध्ये प्रथम, जाहिरात स्टीटमध्ये प्रथम, ब्रेन-ओ-थॉनमध्ये प्रथम आणि तृतीय, नृत्यात द्वितीय, नाटकात द्वितीय, कोलाज मेकिंग मध्ये द्वितीय, पोस्टर मेकिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचे सर्वोत्कृष्ट विजेते आणि वरिष्ठ गट विजेतेपद देखील किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने पटकावले. यापूर्वी सुद्धा किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलने सहभाग घेऊन २०२१ २२ मध्ये २ ट्राफी, २०२२ – २३ मध्ये ३ ट्राफी मटकवून, या वर्षी उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे सर्वोच्च स्थान पटकावले.
    विजयी संघामध्ये १० वी चे प्रणव जैन, अनुष्का गांधी, तनीश जैन, कार्तिक सैदाणे, दर्शना जैन, ज्ञानेश मानकरे, पार्थ दौलतानी, ९ वी चे पार्थ अंदर, पलक झंवर, सिध्दांत शिरसाळे, अदिती मुथा, सोहा मेश्री व निशिका आसावा ८ वी चे किमया कावडीया,आरव शाह, जिया मर्चंट, गार्गी मिश्रा, सानिका भंसाली, मोक्ष जैन व मयूराक्षी शर्मा या विद्यार्थ्यांचा समावेश होता. सर्वोत्कृष्ट विजेतेपदाचे पारितोषिक स्वीकारल्यावर संघ व्यवस्थापक आणि विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.यावेळी त्यांंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.विजयी संघाने शाळेचे अध्यक्ष आदेश ललवाणी, मुख्याध्यापिका मीनल जैन, संचालिका हर्षिता ललवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादन केले. संघाला उपमुख्याध्यापिका ममता खोना, कृती जैन, मिलन साळवी, राखी गौर,हेलेना शेफर्ड, शालीनी मेहता, मोहन गोमासे, रचना महाजन, हर्षदा दुसाने, स्वाती महाजन, दीपक नेवे,योगेश मदने, नरेश रायसिघांनी, अशोक नेरकर, भूषण शिंपी, महेंद्र तायडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. विजयी संघाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. किड्स गुरुकुलने या स्पर्धेतील घवघवीत यशामुळे उत्तर महाराष्ट्रतील शिक्षण क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Kho-Kho Competition : खो-खो स्पर्धेच्या जिल्हा संघाच्या कर्णधारपदी मोहित गुंजकर, किरण बोदडे

    December 17, 2025

    Malkapur : शालेय राज्यस्तरीय चॉकबॉल स्पर्धेत यशोधाम पब्लिक स्कूलच्या

    December 16, 2025

    ‘Fun Activities’ Program : ‘गंमत गोष्टी’ उपक्रमात खेळ, वाचनासह नाट्याची मेजवानी

    December 16, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.