परिश्रम, संघर्ष, महत्त्वाकांक्षेतुनच जळगाव अतिविकसित होईल

0
12
परिश्रम, संघर्ष, महत्त्वाकांक्षेतुनच जळगाव अतिविकसित होईल-saimatlive.com

जळगाव साईमत प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्याचे लोकेशन हे विकासाच्या सर्वच दृष्टीने सकारात्मक आणि उपयुक्त आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाने जर परिश्रम, संघर्ष केला तर विकासाच्या जागतिक नकाशावर जळगाव जिल्हा निश्चितच आघाडीवर राहील. या जिल्ह्यात आज रेल्वे, महामार्ग, वीज विमानसेवा, जागा सर्वच उपलब्ध आहे. जळगाव जिल्हा तसा विकसित आहे. स्थानिक जळगावकरांनी मनात आणले तर हा जिल्हा अतिविकसित व्हायला वेळ लागणार नाही, मी जिल्हाधिकारी म्हणुन तसा प्रयत्न करणार आहे, केवळ प्रत्येक जळगावकराने लहान विचार न करता, काही तरी वेगळे आणि मोठे करण्याचा विचार करावा. त्यानंतर बदल आपोआप दिसतील, असे मत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी, साईमत ‘शी बोलताना व्यक्त केले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी, साईमतच्या एमआयडीसी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी साईमतचे मुख्य संपादक प्रमोद बऱ्हाटे, संचालक परेश बऱ्हाटे, धनाजी नाना चौधरी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. पी. आर चौधरी, कार्यकारी संपादक त्र्यंबक कापडे आणि सर्व सहकारी उपस्थित होते.
श्री गणेशाची आरती झाल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साईमतशी संवाद साधताना विविध विषयांवर चर्चा केली . आयुष प्रसाद यांनी सांगितले की, ते जेथे जातात, ते त्या गावाचे, जिल्ह्याचे होऊन जातात. त्या जिल्ह्याला आपला जिल्हा म्हणुन काम करतात. त्यामुळे माझे मूळ गाव मला निश्चित सांगता येत नाही.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद ज्या कुटुंबातून आले आहेत, त्या परिवारात आणि नाते संबधात आय ए एस, आयपीएस, आणि वेगवेगळया पदांवर काम करणारे अधिकारी आहेत, हे कसे.? या प्रश्नाचे उत्तर देतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, १८५० सालापासून आमचा परिवार हा अविभक्त आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने कष्ट केले, मेहनत घेतली, संघर्ष केला, त्यातूनच सर्वांना यश मिळाले. आज माझी आई कर्नाटक राज्यात न्यायालयीन प्रशासनात उच्च पदावर आहेत. वडील आयपीएस होते. सासरे स्वता आयएएस आहेत. बहीण कार्पोरेट ऑडव्होकेट आहेत. माझे आजोबा आणि आईचे वडील देखील प्रशासकीय सेवेत होते. हे सर्व प्रत्येकाच्या कष्टातून उभे राहिले आहे. कष्ट, परिश्रम, महत्वाकांक्षा असल्या तर माणूस आपोआप पुढे जातो. स्वतःबरोबर आपले शहर, आपले राज्य, आपला देश प्रगतीपथावर नेत असतो.

 

माझे जळगावकरांना हेच सांगणे आहे की,सकारात्मक स्पर्धा करा, उणिवा दाखविण्यासाठी नाही तर काही तरी वेगळे करण्यासाठी स्पर्धा असावी, संघर्ष करा, महत्त्वाकांक्षा ठेवा, विचार मोठा करा. आज जळगाव शहरातील मुल आयटी क्षेत्रात सर्वाधिक आहेत. अशीच प्रगती सर्वच क्षेत्रात केली तर लवकरच जळगाव जिल्हा अति विकसीत होईल, याची मला खात्री आहे, असे जिल्हाधिकारी शेवटी म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here