जळगाव : प्रतिनिधी
क्रीडा व युवा सेवा संचालन महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जळगाव शहर महानगरपालिका,एकलव्य क्रीडा संकुल,स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय मनपास्तरीय स्क्वॉश स्पर्धा २०२३-२४ उत्साहात झाल्या.
उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मु.जे. महाविद्यालयाचे क्रीडा संंचालक प्रा.डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर सर, मनपा क्रीडा अधिकारी दिनानाथ भामरे,पर्यवेक्षक प्रा.आर.बी.ठाकरे,चेअरमन प्रा.शिल्पा सरोदे, प्रा.स्वाती बराटे, प्रा.डॉ.निलेश जोशी यांची विशेष उपस्थिती होती.
उद् घाटन प्रत्यक्ष खेळून प्रा.डॉ.बेलोरकर सर यांनी केले.या स्पर्धेमध्ये आठ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी सहभाग नोंंदविला.या स्पर्धेसाठी एकूण ५३ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच स्पर्धा प्रमुख प्रा.प्रवीण कोल्हे, शुभम शिसोदे, अनिरुद्ध जाधव ,गजानन खरात, कोमल पाटील,आशिष पाटील, नरेंद्र भोई, पवन चव्हाण यांनी सहकार्य लाभले.शेवटी आभार प्रा.स्वाती बराटे यांनी मानले.सूत्रसंचालन डॉ.रणजीत पाटील यांनी केले.